Wednesday, 4 December 2019

WORLD AIDS, ERADICATION DAY AWARENESS PROGRAM. (स्वच्छता व एड्स जनजागृती रॅॅलीचे आयोजन)

रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे स्वच्छता व एड्स जनजागृती रॅॅलीचे आयोजन 

दिनांक :- ०४/१२/२०१९ 
रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे जागतिक एड्स निर्मुलन  व स्वच्छता पखवाडा दिनानिमित्य  ६ महाराष्ट्र बटालियन, १९ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४.१२.२०१९ रोज बुधवार रोजी  भारतात नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच एड्स या रोगाबद्ल समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयातील ६ महाराष्ट्र बटालियन, १९ महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅॅलीचे आयोजन सकाळी ९:०० वाजता महाविद्यालय ते कृष्णा नाका व कृष्णा नाका ते साई गार्डन व रयत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातून महाविद्यालयाच्या प्रा. एन डी. पाटील प्रेक्षकगृहा पर्यंत करण्यात आले. 
या रॅॅलीतून CDT नी एड्स  व स्वच्छतेबद्दल जनजागृती करणार्या अनेक घोषणा दिल्या. 
या रॅॅलीत SD = २५, SW = ३०  व NSS = ४० व BIO तंत्रज्ञान शाखेतील ४० विद्यार्थी, याच बरोबर ANO- १, CTO- १ व प्राध्यापक =४ सहभागी झाले होते. 
या कार्यक्रमासाठी समुपदेशक म्हणून  मान. किरण कांबळे (ग्रामीण रुग्णालय उंडाळे) व त्याचे सहकारी याची उपस्थिती होती.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे .......................................