Thursday 29 August 2019

HIV /AIDS PREVENTION AND AWARENESS CAMPAIGN-(“HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम”)



सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई.
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम
दिनांक :- 29/08/2019
               

HIV /AIDS PREVENTION AND AWARENESS CAMPAIGN 


    On 12 August, on the occasion of International Youth Day, Maharashtra state AIDS control society, Mumbai and NCC department of college jointly organized a program called “HIV/AIDS prevention and awareness program”. The initiative was taken by honourable Kiran Kambhar (Hospital, Undale). The program presided over vice-principal doctor S.R. Sawant. The introductory speech was made by NCC CTO professor Sandeep Mahajan present cadets SD-35 &SW-40 were present for the event.


   सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात दिनांक 29/08/२०१९ रोजी १२ ऑगस्ट अंतरराष्ट्रीय युवा दिन" चे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई व महाविद्यालयातील एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
                        कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख समुपदेशक म्हणून  मान. किरण कांबळे (ग्रामीण रुग्णालय उंडाळे)  यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.आर सावंत हे होते. प्रास्ताविक एनसीसी विभागाचे प्रमुख प्रा.संदीप महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. पी एस कर्डिले यांनी मानले. सूत्रसंचालन SGT शिवानी निकम यांनी केले. या कार्यक्रमासाठी एनसीसी मुले 35 व मुली ४० उपस्थित होते.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .




























Wednesday 28 August 2019

73rd Independence Day and Swachhata Abhiyan - 15 August 2019.

73rd Independence Day and swachhata Abhiyan - 15 August 2019.

On the occasion of Independence Day Principal, Dr Mohan Rajmane Saheb hosted the flag and read out the message. NCC pledge was taken by the NCC cadets after that.  NCC cadet visited the flood-affected village Retre of Satara district. On the occasion of Independence Day cadets who visited Retre Khurd and Khubi village cultivated a social commitment by cleaning helping the flood victims. Principal Dr Mohan Rajamane encouraged this work,  also permission was given by Colonel Prashant Pawar of the 19 Maharashtra battalion for this work. NCC girls Captain Sunita Shinde,  former NCC Major Ravindra Rankhambe and former NCC cadet from Retre- Khurd village provide valuable assistance.

"स्वच्छता पखवाडा"च्या माध्यमातून महापुरग्रस्त रेठरे खुर्द या गावाची स्वच्छता 
दि. १५ ऑगस्ट २०१९ 
       रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड मधील एनसीसी कॅडेट्स यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील महापूरग्रस्त गाव रेठरे खुर्द या गावी जाऊन "स्वच्छता पखवाडा"च्या माध्यमातून रेठरे खुर्द या गावाची स्वच्छता केली. स्वच्छता करण्यासाठी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी प्रोत्साहन दिले. तसेच या कामासाठी 19 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल पवार साहेब यांची परवानगी मिळाली.
       या स्वच्छतेसाठी रेठरे खुर्द गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच समस्त गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले. याच बरोबर माजी उपसरपंच जाधव साहेब यांनी एनसीसी कॅडेट यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली.  महाविद्यालयातील कर्मचारी संदीप जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रेठरे खुर्द हे गाव खुद्द महाविद्यालयातील कर्मचारी संदीप जाधव यांचे गाव असून महाविद्यालयाने त्यांच्या गावाची स्वच्छता करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यात एनसीसी  मुलीच्या कॅप्टन शिंदे मॅडम  एनसीसी बॉईज चे माजी मेजर आर. रनखांबे सर व रेठरे खुर्द गावातील माजी  एनसीसी कॅडेट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .