Thursday 19 December 2019

Commanding Officer Colonel Pankaj Sati's visit to the college ...

१७ डिसेंबर २०१९, मंगळवार

             The newly appointed commanding officer of 19 Maharashtra Battalion NCC Karad visited SGM college on 17th December. The visit was to review the facilities of various colleges in Karad city for pre-preparation of the B certificate exam which was to be held in karad in February 2020. SM Khatri and SM Nalwade Sahab from 19 Maharashtra Battalion NCC Karad officers were present. 


                19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी , कराड येथील नवनियुक्त कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयास दिनांक १७ डिसेंबर २०१९ रोजी भेट दिली. 
              19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड यांच्याद्वारे एनसीसी "ब" प्रमाणपत्र परीक्षा कराड या शहरात फेब्रुवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेची पूर्व तयारी करीता कराड शहरातील विविध महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी ही भेट होती. 
                  कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती यांचे महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचे उपरणे, महाविद्यालयाचा वार्षिकांक भेट देवून स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
            कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती यांनी  19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड यांच्याद्वारे एनसीसी "ब " प्रमाणपत्र परीक्षेसाठी लागण-या सुविधांबाबत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांच्याशी चर्चा केली. प्राचार्य साहेबांनी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दाखविली. महाविद्यालयातील 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटचे CTO प्रा. संदिप महाजन यांनी कर्नल पंकज सती यांना महाविद्यालयातील वर्गखोल्या, मान. अभिजित कदम क्रीडा संकुल या बाबत माहिती दिली. त्याचबरोबर कर्नल पंकज सती यांनी एनसीसी युनिटला भेट दिली व आगंतुक वहीत आपला अभिप्राय नोंदविला. 
                    यावेळी ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटच्या (मुली) ANO कॅप्टन सुनिता शिंदे, 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ऑफिसमधील खत्री साहेब, नलवडे साहेब उपस्थित होते.


CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .






Wednesday 18 December 2019

(Vijay Divas)16 डिसेंबर "विजय दिवस" कार्यक्रम संपन्न

 16 DEC.2019
                 The program was organized by Vijay Divas Smarak Samiti Karad was held on 16th December. For this event SGM college disciplined parade of 19 Maharashtra battalion NCC was organized at Chhatrapati Shivaji stadium karad. 56 SD and SW participated. Guided by the Principal Dr Mohan Rajmane.



                विजय दिवस स्मारक समिती कराड यांच्याद्वारे आयोजित विजय दिवस समारोह-2019 (वर्ष 22 वे) दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी एस. जी.एम. कॉलेज कराड येथील 19 महाराष्ट्र बटालियन NCC  56 SD व SW विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध परेड छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथे आयोजित करण्यात आली.
                    या परेडची पूर्व तयारी म्हणून दिनांक 13,14,15, डिसेंबर पासुन शिस्तबद्ध कवायतीसाठी पूर्व तयारी सुरू आहे . यासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराड येथिल स्टाफ तसेच VC व YC कॉलेज कराड येथील एस जी एम कॉलेजमधील वूमन मिलिटरी अकॅडमी याचे समनवयक मेजर रनखांबे, ANO लेफ्टनंट डॉ कदम-पाटील व लेफ्टनंट डॉ माळी याचे सहकार्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे .......................................















विजय दिवस मॉक ड्रिल परेड

                  15 DEC.2019
                   विजय दिवस स्मारक समिती कराड यांच्याद्वारे आयोजित विजय दिवस समारोह-2019 (वर्ष 22 वे) दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एस. जी.एम. कॉलेज कराड येथील 19 महाराष्ट्र बटालियन NCC  56 SD व SW विद्यार्थ्यांची मॉक ड्रिल परेड छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
                    या परेडची पूर्व तयारी म्हणून दिनांक 13,14,15, डिसेंबर पासुन शिस्तबद्ध कवायतीसाठी पूर्व तयारी सुरू आहे . यासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराड येथिल स्टाफ तसेच VC व YC कॉलेज कराड येथील एस जी एम कॉलेजमधील वूमन मिलिटरी अकॅडमी याचे समनवयक मेजर रनखांबे, ANO लेफ्टनंट डॉ कदम-पाटील व लेफ्टनंट डॉ माळी याचे सहकार्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.


CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे .......................................




Saturday 7 December 2019

Protecting from Plastic - Cleanliness is Safety (प्लास्टिक से रक्षा - स्वच्छता ही सुरक्षा)

Protecting from Plastic - Cleanliness is Safety

 (7TH DECEMBER 2019)


SGM College Karad, YC College Karad, VC College Karad, 6 MAH Battalion Kolhapur and 19 Maharashtra Battalion NCC Karad collected 300 Kg. Garbage and plastics from YC College to SGM College Karad were collected and handed over to Gram Panchayat Saidpur.

PLOGGING (स्वच्छता पखवाडा मोहीम) 
"प्लास्टिक से रक्षा - स्वच्छता ही सुरक्षा"

2327/TSC-19/DGNCC/Trg A -ON DATED-03 DEC.2019
Directorate General of NCC.

ACTION PLAN - SWACHHTA PAKHAWADA 01-15 DEC.2019 

दिनांक :- ०७.१२.२०१९. कराड

सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, वेणूताई चव्हाण महाविद्यालय कराड व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक -०७.१२.२०१९ रोजी ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी व 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड यांच्या १२७ छात्र सैनिकांनी यशवंतराव कॉलेज परिसरातून ते सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड पर्यंत ३०० किलो कचरा व प्लास्टिक वेचून ग्रामपंचायत सैदापूर यांच्या स्वाधीन केला.
Directorate General of NCC.यांच्या वरील परिपत्रकानुसार स्वच्छता पखवाडा मोहीम ०१ - १५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. या मधील दिनांक ०७-१२-२०१९ या दिवशी Plogging - म्हणजेच जोग्गिंग करतांनी कचरा उचलणे (Plogging is a combination of jogging with picking up litter) हा कार्यक्रम वरील तीन महाविद्यालयाच्या संयुन्क्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. 
या Plogging साठी १२७ छात्र सैनिकांनी सहभाग नोंदविला ज्यात SW= 59, SD= 68 ANO=02 , CTO = 01 यांचा समावेश होता. सामान्य नागरिकांनी या मोहिमेत महाविद्यालयातील 12 कर्मचार्यांनी यात सहभाग नोंदविला. या सर्वांनी 300 किलो प्लास्टिक व कचरा ग्रामपंचायत सैदापूर यांच्या सुपूर्द केला.


CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे .......................................