Thursday 19 December 2019

Commanding Officer Colonel Pankaj Sati's visit to the college ...

१७ डिसेंबर २०१९, मंगळवार

             The newly appointed commanding officer of 19 Maharashtra Battalion NCC Karad visited SGM college on 17th December. The visit was to review the facilities of various colleges in Karad city for pre-preparation of the B certificate exam which was to be held in karad in February 2020. SM Khatri and SM Nalwade Sahab from 19 Maharashtra Battalion NCC Karad officers were present. 


                19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी , कराड येथील नवनियुक्त कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयास दिनांक १७ डिसेंबर २०१९ रोजी भेट दिली. 
              19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड यांच्याद्वारे एनसीसी "ब" प्रमाणपत्र परीक्षा कराड या शहरात फेब्रुवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेची पूर्व तयारी करीता कराड शहरातील विविध महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी ही भेट होती. 
                  कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती यांचे महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचे उपरणे, महाविद्यालयाचा वार्षिकांक भेट देवून स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
            कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती यांनी  19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड यांच्याद्वारे एनसीसी "ब " प्रमाणपत्र परीक्षेसाठी लागण-या सुविधांबाबत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांच्याशी चर्चा केली. प्राचार्य साहेबांनी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दाखविली. महाविद्यालयातील 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटचे CTO प्रा. संदिप महाजन यांनी कर्नल पंकज सती यांना महाविद्यालयातील वर्गखोल्या, मान. अभिजित कदम क्रीडा संकुल या बाबत माहिती दिली. त्याचबरोबर कर्नल पंकज सती यांनी एनसीसी युनिटला भेट दिली व आगंतुक वहीत आपला अभिप्राय नोंदविला. 
                    यावेळी ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटच्या (मुली) ANO कॅप्टन सुनिता शिंदे, 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ऑफिसमधील खत्री साहेब, नलवडे साहेब उपस्थित होते.


CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .






No comments:

Post a Comment