Sadguru Gadge Maharaj College Karad B.A. Part III (History) NCO student SUO Ankit Rajkumar Shinde has been selected for the conduct of Republic Day NCC to be held on 26th January 2020 at Rajpath in Delhi. The Honorable Principal of the College, Dr Mohan Rajmane felicitated SUO Ankit Rajkumar Shinde on behalf of the college.
दिनांक :- ३१.१२.२०१९
सदगुरू गाडगे
महाराज महाविद्यालय कराड येथील बी.ए. भाग तीन (इतिहास) NCC मधील विद्यार्थी SUO
अंकित राजकुमार शिंदे यांची 26 जानेवारी २०२० रोजी दिल्ली येथील राजपथावर होणा-या प्रजासत्ताक
दिनाच्या NCC च्या संचलनासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे सन्माननीय
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी SUO अंकित राजकुमार शिंदे यांचा महविद्यालयाच्या
वतीने सत्कार केला. या प्रसंगी NCC चे प्रमुख CTO प्रा. संदिप महाजन, इतिहास
विभागप्रमुख प्रा. नेताजी सूर्यवंशी, विभागातील प्रा. डॉ. एन. आर. रणखंबे, प्रा. डॉ. अभयकुमार पाटील उपस्थित होते.
SUO अंकित राजकुमार शिंदे याला निवृत्त NCC
प्रमुख मेजर प्रा. रवींद्र रणखंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 19 महाराष्ट्र
बटालियन कराड येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल पंकज सती, निवृत्त कर्नल प्रशांत पवार,
A.O कर्नल जीएफए दगामारोसे, सुभेदार मेजर एस.बी.खत्री, सुभेदार जयवंत नलवडे व BHM
पृथ्वीराज कदम यांनी प्रजासत्ताक दिन संचलनासाठी SUO अंकित राजकुमार शिंदेची सर्व तयारी
करून घेतली व मार्गदर्शन केले होते. SUO अंकित राजकुमार शिंदेची निवड ही
महाविद्यालयासाठी सन्मानाची बाब आहे.
महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने SUO अंकित राजकुमार शिंदे यांचा महविद्यालयाच्या वतीने सत्कार करतांना.
CTO
प्रा. संदीप महाजन
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
No comments:
Post a Comment