Monday 6 January 2020

Tribute to Jawan Sandeep Sawant from College (January 3, 2019)

दिनांक ०३.०१.२०२०
कराड
                Martyr Sandeep Sawant was Martyred while defeating terrorists, students of 19 Maharashtra battle NCC from SGM college Karad paid homage to this heroic son of mother India. 53 SD & SW was present. The feeling that the country will be always aware of his sacrifice was expressed by the principal Dr Mohan Rajmane.




                    दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड मधील 19 महाराष्ट्र बटालियन NCC येथील छात्र सैनिकांनी भारत मातेच्या या वीर सुपुत्राला मानवंदना दिली. यावेळी NCC मधील 53 छात्र सैनिक SD व SW उपस्थित होते.  संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
                   १ जानेवारीला पहाटे नाईक संदीप सावंत  यांना  दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केल्या.
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .

















No comments:

Post a Comment