Tuesday 28 January 2020

NATIONAL VOTERS DAY (25TH JANUARY 2020)

राष्ट्रीय मतदार दिन निमित्य प्रतिज्ञा 

दिनांक - २४.०१.२०२०
कराड 
        By the orders of the election commission of India and Government of Maharashtra on the occasion of 25th January National voters day. The national voters day event was arranged for 24th January. In the presence of honourable Principal Dr Mohan Rajmane and honourable Mr Amardeep Wakde the (Tehsildar and executive magistrate, Karad). Total 32 SD, 47 SW, 01CTO, 30 NSS others 100 students were present.


                      मतदानाचा टक्का वाढवा तसेच प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने अनेक स्तरांवर विशेष प्रयत्न होत आहेत. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून जात, धर्म आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन आयोगाच्या वतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये करण्यात येते. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निपक्ष मतदान करण्यासाठी यंदा प्रथमच मतदारांसाठी प्रतिज्ञा तयार करण्यात आली आहे.  
                            यासाठी निवडणूक आयोग व महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशान्वे रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे "२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिना" चे औचित्य साधून दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी देशातील भावी मतदार राजाला म्हणजेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व सर्व प्राध्यापकाना मतदारांसाठीची प्रतिज्ञा देण्यात आली.
                            या कार्यक्रमाचे आयोजन 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड व सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
                           २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता मा. अमरदीप वाकडे (तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ,कराड) व महाविद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने याच्या उपस्थित मा. अमरदीप वाकडे साहेब यांनी भावी मतदारांना प्रतिज्ञा दिली.
 यामध्ये जात, धर्म, वंश समाज, भाषा, यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
                                  या कार्यक्रमासाठी एकूण SD= ३२, SW = ४७, CTO= १ NSS= ३० इतर = १०० विद्यार्थी उपस्थित होते.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा 

























31ST NATIONAL RD SAFETY WEEK(11TH -17 JANUARY 2020)

दि. ११ ते १७ जानेवारी २०२० - राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह 

दिनांक. १७.०१.२०२०
कराड 
                    19 Maharashtra battalion in NCC Karad, 6 Maharashtra battalion  NCC Kolhapur, SGM college karad, traffic control branch Karad and safe road foundation, New Delhi jointly organized 31st National road safety week on 17 January 2020. Volunteers created awareness about road safety. Shripal Oswal guided through an audio-visual medium. Total 30 SD, 48 SW, one CTO were present for the event. 


                19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड,  6 महाराष्ट्र बटालियन NCC कोल्हापूर-  सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, वाहतूक नियंत्रण शाखा (RTO) कराड आणि  SAFE ROAD FOUNDATION, NEW DELHI यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक १७.०१.२०२० रोजी "३१ वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह"  साजरा करण्यात आला. 
               रस्ते सुरक्षीत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी SAFE ROAD FOUNDATION, NEW DELHI याचे स्वयंसेवक मा. श्रीपालजी ओसवाल (प्रमाणित प्रशिक्षक, कराड) यांनी  १ तासाच्या दृक्श्राव्य माधमातून रस्ते सुरक्षितते बाबत मार्गदर्शन केले. भारत हि दुर्घटनांची राजधानी आहे. अपघातात १२-३४ वयोगटातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यासाठी सुरक्षितता म्हणून रत्यावर चालताना, गाडी चालवितांना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, वाहतुकीचे नियम कसे पाळता येईल, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नये, DONT'S DRINK AND DRIVE, असे मार्गदर्शन केले.
                 या प्रसंगी कराड वाहतूक नियंत्रण शाखा (RTO) कराड, येथील कॉन्स्टेबल श्री. मिथुन बोलके उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
                       या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. प्रा. बाबासाहेब नदाफ (समाजशास्त्र विभाग प्रमुख) यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमासाठी एकूण SD= ३०, SW = ४८, CTO= १ उपस्थित होते.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .

















Tuesday 7 January 2020

Tree plantation -(वृक्ष लागवड -०५ जुलै, २०१९)

Tree plantation -5 July 2019.

4 crore tree plantation programme conducted by finance and planning

Forest Ministry of Government of Maharashtra from 1st July 27 July 2019, 

candidates of 19 Maharashtra battalion NCC Karad contributed.  164 trees were planted

on a college campus.  During this program SD- 24, SW-11 = 34, CTO- 1, where present.

Also, the principal of the college Dr Mohan Rajmane planted trees.

------------------------------------------------------

दिनांक :- ०५ जुलै, २०१९
कराड
            वित्त व नियोजन वने महाराष्ट्र शासन यांचे वतीने दिनांक १ जुलै ते ७ जुलै २०१९ या कालावधीत हाती घेण्यात येणा-या ४ कोटी वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमात १९ महाराष्ट बटालियन NCC कराड च्या छात्र सैनिकांचा सहभाग .
               यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात खालील वृक्षांची लागवड करण्यात आली.
                                    वृक्षाचे नाव               रोपांची संख्या             
                                          बकुली                 १०
                                          Filicum              ९५
                                          BHAVA              १५
                                          LXORA              २५
                                          PALM                 १०
                                          TAMAN              १०
                                         एकूण                    १६५
            सहभागी छात्र सैनिक = SD- २४, SW- ११ = ३५ CTO- ०१
       या वेळी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले.
















Monday 6 January 2020

(AWARENESS RALLY AND DISPLAY OF UNDER MISSION RAINBOW (6TH JANUARY 2019) मिशन इंद्रधनुष अंतर्गत जागरूकता फेरी व विविध फलकाचे प्रदर्शन

दिनांक :- ०६.०१.२०२०
कराड 
                        Vaccination is an effective means of increasing infant mortality & Childhood Mobility. The NCC unit at SGM college had organized a mission rainbow awareness rounds and display of awareness borders. 20 SD and 18 SW 1 CTO 2 PI staff from 19 Maharashtra battalion NCC of college were present. PI staff subedar Nalawde guided the students about mission rainbow.

                       बालमृत्यू व बालकांमधील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. परंतु, जन्मापासून काही बालकांचे लसीकरणच झालेले नाही. काहींनी लसीकरणाचे पूर्ण डोस घेतलेले नाहीत. लसीकरण झाले नसलेल्या वंचित बालक व गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम २.० हा कार्यक्रम भारत सरकारने राबविला आहे. या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराड यांचेकडून आलेल्या पत्रकाद्वारे आज दिनांक ०६.०१.२०२० रोजी रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथील NCC युनिटने " मिशन इंद्रधनुष्य जागरूकता फेरी व जागरूकता फलकांचे प्रदर्शन"  केले होते. यावेळी महाविद्यालयाच्या 19 महाराष्ट्र बटालियन NCC मधील SD=20 व SW=18, CTO= 1, PI स्टाफ= 2 उपस्थित होते.
            या प्रसंगी PI स्टाफ सुभेदार नलवडे यांनी विद्यार्थ्यांना मिशन इंद्रधनुष याबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी या अभियानास शुभेच्छ्या  दिल्या.


CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .