Wednesday, 9 June 2021

५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा .....

 शनिवार, दिनांक ५ जून २०२१ , 

    दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असल्याने यावेळी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. लॉकडाऊनमुळे कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसं कमी झालं आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा असेल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम 'वेळ आणि निसर्ग' अशी आहे.

    महाविद्यालयातील १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी याच्या वतीने '५ जून -जागतिक पर्यावरण दिन' कोविड -१९  महामारीचे सर्व निकष पाळून साजरा करण्यात आला. एनसीसी छात्र सैनिकांनी आप-आपल्या घरी व शेतात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपला सहभाग नोंदविला. जागतिक पर्यावर दिनाचे महत्व सांगणारे व्हिडीओ छात्र सैनिकांनी प्रसारित केले.

    दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.


 









No comments:

Post a Comment