सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथील 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड येथील छात्र सैनिक कॅडेट स्वरूपा मोरे हिची बीएसएफ, मुंबई पोलीस व वन परीक्षक या तीन पदावर एकाचवेळी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वरूपा मोरे ही 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड येथील 2019-20 बॅचची छात्र सैनिक आहे. स्वरूपा मोरे ही महाविद्यालयातील बीकॉम विभागाची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे आई-वडील, विभागातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयातील 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड येथील युनिटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट प्रा. संदीप महाजन यांनी अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातचे उप-प्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विद्या पाटील उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment