Thursday, 2 November 2023

कॅडेट ऐश्वर्या माने यांची फायरमन पदावर निवड

सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथील 19 महाराष्ट्र बटालियन एनसिसी कराड मधील छात्र सैनिक JUO ऐश्वर्या लक्ष्मण माने हिची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागातील फायरमॅन या पदावर निवड झाली आहे. याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने हार्दिक अभिनंदन. तिने महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तिने राष्ट्रीय छात्र सेनेतून* *अखिल भारतीय थल सेना कॅम्प* **नवी दिल्लीसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या आदर्श विद्यार्थीनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उपप्राचार्य प्रा.एस.ए.पाटील, उपप्राचार्य प्रा.नेताजी सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. माधुरी कांबळे यासोबतच माजी राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख मेजर रवींद्र रणखांबे,लेफ्टनंट संदीप महाजन यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तीला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment