Saturday, 30 November 2019

INAUGURATION OF SANITIZATION FORTNIGHT, WORLD AIDS, ERADICATION DAY AWARENESS PROGRAM. (स्वच्छता पखवाडा दि. ०१ डिसे. ते १४ डिसे. २०१९)

INAUGURATION OF SANITIZATION FORTNIGHT, WORLD AIDS, ERADICATION DAY AWARENESS PROGRAM.          (1ST DECEMBER 2019)

This was a circular regarding “Swachhata Pakhwada” conducted by 19 Maharashtra battalion NCC Karad from 1 December to 14th December. Accordingly, 6 and 19 Maharashtra battalion NCC in association with honourable Dr Dayanand Karale inaugurated the program. At this time cadets were told about the importance of cleanliness. CTO of 19 Maharashtra battalion Prof Sandip Mahajan. SD-15 SW-22 were present.

"स्वच्छता पखवाडाचे उदघाटन व जागतिक एड्स निर्मुलन दिन जनजागृती कार्यक्रम"
    दिनांक:- ०१.१२.२०१९, रविवार 
                 रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात दिनांक ०१ डिसेंबर रोजी "स्वच्छता पखवाडाचे उदघाटन व जागतिक एड्स निर्मुलन दिन जनजागृती कार्यक्रम" आयोजित करण्यात आला. 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड यांचे  दि. ०१ डिसे. ते १४ डिसे. २०१९ या दरम्याच्या काळात "स्वच्छता पखवाडा" आयोजित करण्यासंबधीचे परिपत्रक होते. यास अनुसरून महाविद्यालयातील 6 व 19  महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८:३० वाजता महाविद्यालयात मान. डॉ. दयानंद कराळे ( प्राध्यापक, बीएड कॉलेज कराड ) यांच्या हस्ते स्वच्छता पखवाडाचे उदघाटन करण्यात आले. 
 यावेळी स्वच्छतेचे महत्व एन.सी.सी. छात्र सैनिकांना पटवून दिले.  
 १ डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मुलन दिन. या दिनाचे औचित्य साधून एड्सबद्दल माहिती दिली. याच बरोबर त्यांनी एड्स निर्मुलनासाठी उपाय योजनांची माहिती दिली. 
 या प्रसंगी डॉ. राजहंस (कृष्णा महाविद्यालय, रेटरे (बु.) उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा विद्यार्थाना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले., व एड्स या रोगाविषयी माहिती सांगितली.
  या कार्यक्रमाचे  अध्यक्ष स्थान 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी (SW) च्या प्रमुख कॅ. सुनीता शिंदे यांनी भूषविले. 
 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी (SW/SD) चे  CTO प्रा. संदीप महाजन यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना स्वछेतेबाबत शपथ वाचून दाखविली .
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप महाजन यांनी केले. या कार्यक्रमास SW =22 व SD 15 उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे  काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे -----------------------
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .


































































Tuesday, 26 November 2019

NCC DAY, CONSTITUTION DAY AND MARTYR’S DAY (एन.सी.सी. दिन, संविधान दिन व शहीद दिवसाचे आयोजन)

NCC DAY, CONSTITUTION DAY AND MARTYR’S DAY (26TH NOVEMBER 2019)


24th November 2019 the 4th Sunday of November and 26th November 2019 constitutional day. The event was jointly organized by 6 and 19 Maharashtra battalion NCC national Service plan and department of political science. The program was presided by honourable Principal Dr Mohan Rajmane. The introduction was given by the HOD of political science Prof.  Ajit Gadwe. The honourable Principal got students to read the preamble of the Indian constitution also paid a humble tribute to the hero who martyred in the 26th Nov. 2008 Mumbai terror attack. 6 Maha Battalion NCC chief Capt. Sunita Shinde, 19 Maharashtra battalion NCC CTO  Prof. Sandip Mahajan, program officer, national service scheme Sanjay Patil, Dr Abhay Patil &SD-15 SW-50 =65 were present.

एन.सी.सी. दिन, संविधान दिन व शहीद दिवसाचे आयोजन 
        
 दि. 26.11.2019
 रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज कॉलेज (SGM COLLEGE, KARAD) येथे 24 नोव्हेंबर 2019, (Fourth Sunday of November) व 26 नोव्हेंबर- संविधान दिवस याचे औचित्य साधून महाविद्यालयात एन,सी,सी व संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी 6 व 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 9 : 30 वाजता आयोजन करण्यात अआले होते.
                        या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गाढवे अजित यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन विद्यार्थांकडून करवून घेतले. मान. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी एन सी.सी. दिवसाचे महत्व सांगून शिस्त व अनुशासनाचे महत्व विषद केले. त्याच बरोबर भारतीय संविधानला आज ७० वर्षानंतरही कसे महत्व आहे याचे महत्व पटवून दिले. भारतरत्न डॉ. आंबेडकर हे किती दूरदृष्टी होते ते या संविधानाच्या उपयोगीतेमुळे स्पष्ट होते असे प्रतिपादन केले.
                              मान. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी 26/11 -2008 या दिवशी मुंबई झालेल्या भ्याड आतंकवादी हमल्यात शहीद झालेल्या वीराना विनम्र श्रद्धांजली वाहिली. 
                                    या कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागाचे प्रा. रणदिवे के.एल. यांनी मानले. या कार्यक्रमास 6 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनच्या प्रमुक कॅ. सुनिता शिंदे, 19 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे CTO प्रा. संदीप महाजन , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.. संजय पाटील, डॉ. अभय पाटील व SD -15 , SW - 50 , CIVIL विद्यार्थी 60 उपस्थित होते. 
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .

या कार्यक्रमाची काही छायाचित्रे पुढील प्रमाणे ---------------