Saturday 30 November 2019

INAUGURATION OF SANITIZATION FORTNIGHT, WORLD AIDS, ERADICATION DAY AWARENESS PROGRAM. (स्वच्छता पखवाडा दि. ०१ डिसे. ते १४ डिसे. २०१९)

INAUGURATION OF SANITIZATION FORTNIGHT, WORLD AIDS, ERADICATION DAY AWARENESS PROGRAM.          (1ST DECEMBER 2019)

This was a circular regarding “Swachhata Pakhwada” conducted by 19 Maharashtra battalion NCC Karad from 1 December to 14th December. Accordingly, 6 and 19 Maharashtra battalion NCC in association with honourable Dr Dayanand Karale inaugurated the program. At this time cadets were told about the importance of cleanliness. CTO of 19 Maharashtra battalion Prof Sandip Mahajan. SD-15 SW-22 were present.

"स्वच्छता पखवाडाचे उदघाटन व जागतिक एड्स निर्मुलन दिन जनजागृती कार्यक्रम"
    दिनांक:- ०१.१२.२०१९, रविवार 
                 रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात दिनांक ०१ डिसेंबर रोजी "स्वच्छता पखवाडाचे उदघाटन व जागतिक एड्स निर्मुलन दिन जनजागृती कार्यक्रम" आयोजित करण्यात आला. 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड यांचे  दि. ०१ डिसे. ते १४ डिसे. २०१९ या दरम्याच्या काळात "स्वच्छता पखवाडा" आयोजित करण्यासंबधीचे परिपत्रक होते. यास अनुसरून महाविद्यालयातील 6 व 19  महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८:३० वाजता महाविद्यालयात मान. डॉ. दयानंद कराळे ( प्राध्यापक, बीएड कॉलेज कराड ) यांच्या हस्ते स्वच्छता पखवाडाचे उदघाटन करण्यात आले. 
 यावेळी स्वच्छतेचे महत्व एन.सी.सी. छात्र सैनिकांना पटवून दिले.  
 १ डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मुलन दिन. या दिनाचे औचित्य साधून एड्सबद्दल माहिती दिली. याच बरोबर त्यांनी एड्स निर्मुलनासाठी उपाय योजनांची माहिती दिली. 
 या प्रसंगी डॉ. राजहंस (कृष्णा महाविद्यालय, रेटरे (बु.) उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा विद्यार्थाना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले., व एड्स या रोगाविषयी माहिती सांगितली.
  या कार्यक्रमाचे  अध्यक्ष स्थान 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी (SW) च्या प्रमुख कॅ. सुनीता शिंदे यांनी भूषविले. 
 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी (SW/SD) चे  CTO प्रा. संदीप महाजन यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना स्वछेतेबाबत शपथ वाचून दाखविली .
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप महाजन यांनी केले. या कार्यक्रमास SW =22 व SD 15 उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे  काही क्षणचित्रे पुढील प्रमाणे -----------------------
CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .


































































No comments:

Post a Comment