Wednesday, 9 June 2021

५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा .....

 शनिवार, दिनांक ५ जून २०२१ , 

    दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असल्याने यावेळी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. लॉकडाऊनमुळे कारखाने, वाहनांची वाहतूक यासह सगळ्याच गोष्टी बंद असल्याने प्रदूषण आपोआपच काहीसं कमी झालं आहे. त्यामुळे पर्यावरणाबाबत लोकांच्या मनातील चिंताही कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिवस मागील वर्षांपेक्षा वेगळा असेल. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 2020 ची थीम 'वेळ आणि निसर्ग' अशी आहे.

    महाविद्यालयातील १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी याच्या वतीने '५ जून -जागतिक पर्यावरण दिन' कोविड -१९  महामारीचे सर्व निकष पाळून साजरा करण्यात आला. एनसीसी छात्र सैनिकांनी आप-आपल्या घरी व शेतात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपला सहभाग नोंदविला. जागतिक पर्यावर दिनाचे महत्व सांगणारे व्हिडीओ छात्र सैनिकांनी प्रसारित केले.

    दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.


 









Friday, 16 April 2021

७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

 

२६ जानेवारी, २०२१

भारताचा ७२ वा प्रजासत्ताक  दिन सोहळा मंगळवार, २६ जानेवारी, २०२१ रोजी संपन्न झाला. समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उप-प्राचार्य, प्राद्यापक, प्रशासकीय सेवक, छात्र सैनिक (१०४), विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांची मानवंदना स्वीकारली. २६ जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयातील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये SUO संकेत श्रीमंत संकपाळ यांच्या नेतृत्वात छात्र सैनिकांनी मा. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांना मानवंदना दिली. नंतर छात्र सैनिकांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथे जावून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेताला.















‘सतर्कता जागरूकता सप्ताह- 2020’

 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर,2020 – ‘सतर्कता जागरूकता सप्ताह- 2020’


“सतर्क भारत, समृद्ध भारत” हे अभियान प्रशासनातील भ्रष्ट्राचार संपविणे, इमानदारी सुनिच्छित करण्यासाठी “ भ्रष्ट्राचारा विरोधी शून्य सहनशीलता” हे तत्व लागू करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.

दिनांक 27 ऑक्टोबर 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 या दरम्यानच्या काळात आपण सर्वांनी ई- सत्यनिष्ठेची शपथ http://www.gov.nic.in  या भारत सरकारच्या संकेत स्थळावर जावून घ्यायची आहे. आपला स्वत:चा शपथ घेतांनाची मिडीया क्लिप, फोटो – smedia-cvc@gov.in या ईमेलवर पाठविण्याचे  किंवा फोटोग्राफ, मिडीया क्लिप – #vigilanceweek2020  यावर हैशटँग करण्याचे आव्हान सर्व शिक्षक व सेवकांना करण्यात आले होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्व सेवकांना “सतर्क भारत, समृद्ध भारत” शपथ दिली. 















वसुंधरा अभियान -हरित शपथ

 5 जानेवारी 2021


 वसुंधरा अभियान हरित शपथ


         वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन, सर्व विद्यापीठे, संलग्न महाविद्यालय, पर्यावरण बचाव, वृक्षलागवड, भूमिसुधार कार्यक्रम व पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी विद्यार्थी सेवक व समाजातील सर्व घटकांसाठी पर्यावरणाच्या बाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी हरित शपथ देण्यात यावी असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यास अनुसरून आमच्या महाविद्यालयात दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही हरित शपथ घेण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना मधील छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, जिमखाना विभागातील विद्यार्थी  व महाविद्यालयातील शिक्षक व सेवक वर्ग उपस्थित होता.

 यावेळी प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी सर्वांना हरित शपथ दिली. तसेच शासनाच्या या  अभियानाचे महत्त्व सर्वांना पटवून सांगितले.











स्वच्छ भारत पखवाडा - १ डिसेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२०

 ७ डिसेंबर २०२० 

        १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या परिपत्रकानुसार सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी आप-आपल्या गावात 'स्वच्छ भारत पखवाडा; साजरा केला. यात कॅडेट्स शिवानी पाटील (वाठार), कॅडेट्स ऋतुजा जाधव अन्य छात्र सैनिकांनी  उसफुर्तपने सहभाग घेतला.