5 जानेवारी 2021
वसुंधरा अभियान हरित शपथ
वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन, सर्व विद्यापीठे, संलग्न महाविद्यालय, पर्यावरण बचाव, वृक्षलागवड, भूमिसुधार कार्यक्रम व पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी विद्यार्थी सेवक व समाजातील सर्व घटकांसाठी पर्यावरणाच्या बाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी हरित शपथ देण्यात यावी असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यास अनुसरून आमच्या महाविद्यालयात दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही हरित शपथ घेण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना मधील छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, जिमखाना विभागातील विद्यार्थी व महाविद्यालयातील शिक्षक व सेवक वर्ग उपस्थित होता.
यावेळी प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी सर्वांना हरित शपथ दिली. तसेच शासनाच्या या अभियानाचे महत्त्व सर्वांना पटवून सांगितले.
No comments:
Post a Comment