कराड :-07.08.2020
19 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अंतर्गत
“बी व्होकल अबाउट लोकल” मोहिमेची 01 ऑगस्ट 2020 - 15 ऑगस्ट 2020 दरम्यान उत्साहात सुरुवात झालेली आहे. 19 महाराष्ट्र बटालियन
एन.सी.सी. कराड अंतर्गत येणा-या 12 महाविद्यालय व 28 शाळांमधील सिनियर व जुनियर
विंग मधील 1600 एन.सी.सी. छात्र सैनिकांनी “बी व्होकल अबाउट लोकल” ची
शपथ घेतलेली आहे. भारतात उत्पादित होणा-या वस्तूंचा दैनंदिन जीवनात उपयोग करणार
असे या शपथेचे स्वरूप आहे.
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आपल्या देशाला “आत्मनिर्भर” बनविण्याची
घोषणा केली आहे. ही मोहीम आपल्या देशात
उत्पादित होणा-या वस्तूंचा वापर व खरेदी याबाबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या घोषानेद्वारा दुस-या स्वदेशी आंदोलनाची सुरवात केलेली आहे.
19
महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. मधील छात्र सैनिक आपल्या संपर्कातील
लोकांना या मोहिमेचे महत्व पटवून देत आहे. यासाठी ब्लॉग,
फेसबुक, ट्विटर, इत्यादी
सामाजिक माध्यमाचा उपयोग ते करत आहेत. आज निर्माण झालेल्या परस्थितीत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयात केलेल्या
उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
19
महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड यांच्या तर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे कि
त्यांनी भारतात उत्पादित होणा-या वस्तू विकत घ्याव्यात जेणेकरून भारत देशआर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment