२६ जानेवारी, २०२१
भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मंगळवार, २६ जानेवारी, २०२१ रोजी संपन्न झाला. समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, उप-प्राचार्य, प्राद्यापक, प्रशासकीय सेवक, छात्र सैनिक (१०४), विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांची मानवंदना स्वीकारली. २६ जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयातील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये SUO संकेत श्रीमंत संकपाळ यांच्या नेतृत्वात छात्र सैनिकांनी मा. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांना मानवंदना दिली. नंतर छात्र सैनिकांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथे जावून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेताला.